Belagavi

एच. एन. सोनवालकर शाळेत रक्तदान, लसीकरण शिबीर

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉ. गिरीश सोनवालकर यांच्या जन्मदिनानिमित्त बेळगावात शुक्रवारी रक्तदान शिबीर, महालसीकरण मोहीम आणि आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

 

बेळगावातील महांतेश नगरातील एच. एन. सोनवालकर शाळेतील महंत भवनात शुक्रवारी रक्तदान, मेगा व्हॅक्सिनेशन, बी. पी.,शुगर तपासणी आणि ऍनिमिया मुक्त भारत अभियान राबविण्यात आले. खा. मंगल अंगडी यांनी त्याचे उदघाटन केले. त्यानंतर बोलताना खा. अंगडी म्हणाल्या, आपले लोकप्रिय पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्ह्यात ३ लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून आज लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे के. एच. सोनवालकर प्रतिष्ठानतर्फे लसीकरण, रक्तदान शिबीर घेण्यात आले हे प्रशंसनीय आहे. अशा अनोख्या पद्धतीने आपला जन्मदिवस साजरा करणाऱ्या डॉ. गिरीश सोनवालकर याना ईश्वर दीर्घायुष्य देवो अशा शुभेच्छा दिल्या.

आ. अनिल बेनके म्हणाले, मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त महालसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. डॉ. गिरीश सोनवालकर अनेकवर्षांपासून लोकांना आरोग्यसेवा देऊन समाजसेवा करत आहेत असे गौरवोद्गार काढले.

या शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान केले. तसेच अनेकांनी लस घेऊन आरोग्य तपासणी करवून घेतली. याप्रसंगी डॉ. गिरीश सोनवालकर, नगरसेवक राजशेखर डोणी, डॉ. शशिकांत कुलगोड, संजीव पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते.

 

Tags: