latest

आलमट्टीचे दरवाजे बंद; अंतर्प्रवाह कमी झाल्याने निर्णय

Share

आलमट्टी जलाशयात कृष्णा नदीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह आता गेल्या दिवसांपासून कमी झाला आहे. त्यामुळे जलाशय भरण्यासाठी सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. केवळ केपीसीएलद्वारेच पाणी सोडण्यात येत आहे.  

 

जलाशयात १.२० लाख क्युसेक्स पाण्याचा अंतर्प्रवाह येत होता. मात्र गुरुवारी तो केवळ ९४.५२७ क्युसेक्स एवढाच झाला. त्यामुळे जलाशयातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यासाठी सर्व दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या केपीसीएलद्वारे ४२ हजार क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जलाशयाची पातळी ५१९.५० मीटर असून सध्या ते ५१९.०६ मीटर इतके भरले आहे.

 

Tags: