Banglore

आईने बाळाला विकल्याच्या घटनेचे विधिमंडळात पडसाद !

Share

विजापूर जिल्हा इस्पितळात दिवसांच्या बाळाला आईनेच विकल्याच्या घटनेचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनात उमटले. विधानसभेत काँग्रेस . एम. बी. पाटील, यशवंतरायगौडा पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

होय, विजापूर जिल्हा इस्पितळात आईनेच बाळाला विकल्याचे प्रकरण संपूर्ण समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. त्यावर विधानसभेत आज चर्चा करण्यात आली. काँग्रेस आ. एम. बी. पाटील यांनी प्रथम हा मुद्दा उपस्थित करत, नर्स, नर्सचा पती आणि आणखी एका व्यक्तीने त्या गरीब महिलेला फूस लावून ५ हजार रु. चे आमिष दाखवून बाळाची विक्री करण्यास भाग पाडले हे हीन कृत्य आहे. बाळाला विकल्यानंतर त्या आईने पुन्हा मला बाळ हवे, ते द्या असे सांगत इस्पितळात परत गेली होती. यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली.

त्यानंतर इंडीचे आ. यशवंतरायगौडा पाटील म्हणाले, गेल्यावर्षी कलबुर्गी, बिदरमध्ये बाळाला विकल्याच्या घटना घडल्याचे ऐकले होते. त्या सुरूच राहिल्या आहेत. इतका विकास साधूनही शोषित वर्गातील त्या महिलेला आम्ही मुलाला विकण्यापासून रोखू शकलो नाही असा खेद व्यक्त करून यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

याला उत्तर देताना कायदा व संसदीय व्यवहारमंत्री जे. सी. माधुस्वामी म्हणाले, रेणुका नामक महिलेने दुसरे अपत्य झाल्यावर गरिबीमुळे त्याला विकल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. याबाबत गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. यातील दोषींवर सरकार कठोर कायदेशीर कारवाई करेल असे आश्वासन दिले.

एकंदर, संत बसवेश्वरांच्या भूमीत घडलेल्या या अर्भक विक्री प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. गरिबीमुळे स्वतःच्याच मुलाला विकण्याची वेळ एका आईवर आली म्हणजे देशाने किती प्रगती केली हा प्रश्न आम्ही स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे.

 

Tags: