Hukkeri

मंदिरे हटवून हिंदूंच्या भावना दुखविणे योग्य नाही : अभिनव मंजुनाथ स्वामी

Share

भारत देश समानतेने नटलेला आहे. त्यामुळे हिंदूंची मंदिरे हटवून त्यांच्या भावना दुखविणे योग्य नाही असे मत हुक्केरी क्यारगुड्ड अवजीकर मठाचे अभिनव मंजुनाथ स्वामी यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी वाहतुकीस अडथळा ठरणारी किंवा अनधिकृतपणे उभारलेली जिल्ह्यात ४६ मंदिरे आहेत. त्यापैकी १७ हटविली असून गणेशोत्सवानंतर उर्वरित मंदिरे हटविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे नुकतेच म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर अभिनव मंजुनाथ स्वामीनी हे मत व्यक्त केले.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना अभिनव मंजुनाथ स्वामी म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या मंदिरे हटविण्याच्या आदेशाची अमलबजावणी अधिकारी करणार. परंतु केवळ हिंदूंची देवालये हटविल्याने हिंदू धर्मियांची मने दुखावली जातील. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करूनच अधिकारी आणि राजकारण्यांनी याबाबत पावले उचलावीत असे त्यांनी सांगितले.

देशातील हिंदूंची अध्यात्मिक केंद्रे निराश्रीतांची आसरा केंद्रे आहेत. त्यामुळे ती हटवू नयेत असे स्वामी मंजुनाथ यांनी सांगितले.

Tags: