विजापूर तालुक्यातील नागठाण गावातील एका घरावर छापा टाकून ग्रामीण पोलिसांनी सुमारे ४ लाखांचा अवैध मध्यसाठा जप्त केला.
नागठाणमधील शिवानंद मेत्री यांच्या मालकीच्या घरातील एका खोलीत अवैध मध्यसाठा करून विक्री करत असल्याची पक्की खबर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पीएसआय जी. एस. उप्पार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात अवैध विक्रीसाठी साठवलेले ११८ मद्याचे बॉक्स आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. त्याची किंमत ३लाख ९२ हजार रु आहे. या प्रकरणातील आरोपी चंद्रशेखर आणि नवीन हे फरारी झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Recent Comments