उसाच्या फडाला अचानक लागलेल्या आगीत ५० हुन अधिक एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील येडूरवाडी गावात बुधवारी सायंकाळी घडली.

मांजरीवाडी आणि येडूरवाडी गावातील १५हुन अधिक शेतकऱ्यांच्या उसाच्या फडाला आग लागली. आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या ४ बंबांनी घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. बुधवारी सायंकाळी लागलेल्या या आगीत शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला लाखो रुपयांचा ऊस जळून नष्ट झाला. आधीच पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर त्यामुळे मीठ चोळल्याप्रमाणे झाले आहे. अंकली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments