Vijayapura

माता न तू वैरिणी…! ८ महिन्यांच्या बाळाला आईने विकले; विजापुरात घटना

Share

माता तू वैरिणीया उक्तीचा प्रत्यय देणा री संतापजनक घटना विजापुरात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच अवघ्या दिवसांच्या बाळा केवळ हजार रुपयांसाठी विकल्याचे स्पष्ट झाले आहे.

होय, मातृत्वाला काळिमा फासण्याचे कृत्य एका आईने केल्याचे उघडकीस आल्याने विजापूर शहरात खळबळ माजली आहे. बिज्जरगी गावची रेणुका सदाशिव कांबळे असे या दुष्ट महिलेचे नाव आहे. रेणुकाला पहिली एक मुलगी आहे. दुसऱ्या बाळंतपणासाठी विजापूर जिल्हा इस्पितळात ती दाखल झाली होती. १९ ऑगस्टला तिची दुसरी प्रसूती झाली आणि तिने पुरुष जातीच्या एका गोंडस बाळाला जन्म दिला. या दरम्यान तिची इस्पितळातील नर्स कस्तुरी पडसलगी हिच्याशी ओळख झाली. २ मुलांचे संगोपन कसे करायचे या चिंतेत असलेल्या रेणुकाला कस्तुरीने, मुलाला सांभाळता येत नसेल तर विकून टाक असा सल्ला दिला आणि ५ हजार रु देण्याचे आमिष दाखवले. जन्म दिलेल्या अवघ्या ८ दिवसांच्या आतच बाळाला रेणुकाने नर्स कस्तुरीला विकून टाकले. हा सर्व व्यवहार जिल्हा इस्पितळाच झाला. त्यावेळी हे बाळ नर्स कस्तुरीचा पती मंजुनाथ आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देण्यात आले. बाळाचा ताबा घेतल्यानंतरच कस्तुरीने रेणुकाला ५ हजार रु दिले. मात्र बाळ दिलेल्या दिवशीच रेणुकाने इस्पितळात येऊन नर्स कस्तुरीकडे बाळाला परत देण्याची मागणी केली. त्यामुळे त्या दोघींमध्ये वादविवाद झाला. याची माहिती बाळ सहाय्य्यवाणीला मिळाली. सहाय्य्यवाणीच्या अधिकाऱ्यांनी लागलीच बिज्जरगी गावाला भेट देऊन रेणुकाची चौकशी केली. या चौकशीत रेणुकाने कस्तुरीला बाळ विकल्याचे कबुली दिली.

या प्रकरणातील सूत्रधार नर्स कस्तुरीसह तिचा पती मंजुनाथ पडसलगी आणि अनोळखीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करून चौकशी चालवली आहे. १२ सप्टेंबरला याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. अद्याप त्या दुर्दैवी बाळाचा शोध लागलेला नाही. दरम्यान, विजापूर जिल्हा इस्पितळ प्रशासनाने नर्स कस्तुरीला निलंबित केले आहे.

 

Tags: