Belagavi

भाजपचे उद्यापासून सेवा आणि समर्पण अभियान

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आणि गुजरातचे मुख्यमंत्री झालेल्या घटनेला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १७ सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत भाजपतर्फे २० दिवसांचे समर्पण अभियान राबवण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबरला आहे. तर ते पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झालेल्या घटनेला ७ ऑक्टोबररोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशावरून या २० दिवसांच्या काळात भाजपतर्फे सेवा आणि समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींना जन्मदिनाच्या केवळ तोंडी शुभेच्छा देऊन चालणार नाही तर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशानुसार जारी केलेल्या SEVA TRIBUTE या APP वर शुभेच्छा द्यायच्या आहेत. सेवा आणि समर्पण अभियानात पक्ष कार्यकर्त्यानी बूथ लेव्हलवर सामाजिक काम करून त्याचा व्हिडिओ या APPवर अपलोड करून शुभेच्छा द्यायच्या आहेत असे जिरली यांनी यावेळी सांगितले.

सेवा आणि समर्पण अभियानात सामाजिक जागृती मोहीम, आत्मनिर्भर भारत मेळावे, तिरंगा यात्रा, विशेष स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही जिरली यांनी सांगितले.

 

 

 

Tags: