Belagavi

हिंदी दिवसाला विरोध : करवेच्या वतीने निदर्शने

Share

 सप्टेंबर १४ हा राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगावात करवेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

१४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा करून केंद्र सरकार घटनेची पायमल्ली करत असल्याचा आरोप करून करवेच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकात निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.  यावेळी बोलताना करवेचे नेते शिवरामेगौडा यांनी केंद्र सरकार हिंदी दिवस साजरा करून बिगरहिंदी भाषकांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला. केंद्राच्या या धोरणाच्या विरोधात पुढील काळात राज्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

करवे कार्यकर्त्यांनी हिंदीला विरोध दर्शवण्यासाठी पंतप्रधान मोदींचे छायाचित्र झळकावण्याचा प्रयत्न केल्यावर पोलीस आणि जिल्हाध्यक्ष माजिद हिरेकोडी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

 

 

Tags: