हिंदी दिवसाच्या माध्यमातून केंद्र सरकार बिगरहिंदी भाषकांवर हिंदी लादत असल्याचा आरोप करत करवे कार्यकर्त्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर निदर्शने केली.

१४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला बेळगावातील कन्नड संघटनांनी विरोध सुरु केला आहे. मंगळवारी करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुङगनट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवे कार्यकर्त्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर निदर्शने केली. काळे कपडे घालून आलेल्या या कार्यकर्त्यांनी एसबीआयसमोर जोरदार निदर्शने करत बँकिंग व्यवस्थेतही कन्नडचा वापर करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुङगनट्टी म्हणाले, केंद्र सरकार आमच्यावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या मतांवर निवडून आलेले आमदार, खासदार यावर मौन बाळगून आहेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला नाही तर लवकरच लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर धरणे धरून निदर्शने करू असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments