Belagavi

नरेगा कामगारांच्या मागण्यांसाठी बेळगावात मोर्चा

Share

 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी शेतकरीकृषी कामगार संघटना आणि ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशनच्या वतीने बेळगावात मंगळवारी निदर्शने करण्यात आली.

नरेगा कामगारांना वेळेवर वेतन द्यावे, प्रतिदिन ६०० रु. वेतन द्यावे, तसेच बर्षभर रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत बेळगावातील चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.   यावेळी बोलताना शेतकरी-कृषी कामगार संघटनेच्या खजिनदार नागम्मा म्हणाल्या, कुली कामगारांना योग्य काम आणि वेळेवर वेतन सरकारने द्यावे. वाढत्या महागाईत वेतनवाढ दिली नाही तर आम्ही जगायचे कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी-कृषी कामगार संघटना आणि ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशनचे सदस्य उपस्थित होते.

 

 

Tags: