Belagavi

भाजप नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Share

 बेळगाव महानगरपालिकेवर निवडून आलेल्या भाजपच्या ३५ नगरसेवकांचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी अभिनंदन केले.

बेळगाव मनपात निवडून आलेल्या भाजपच्या ३५ नगरसेवकांनी सोमवारी बंगळुरात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. इतिहासात प्रथमच भाजपने बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली आणि दणदणीत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सर्व भाजप नगरसेवकांचे अभिनंदन केले.

यावेळी जलसंसाधन मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, नगरविकास मंत्री भैरत्ती बसवराज, मंत्री बी. सी. पाटील, सी. सी. पाटील, आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.

 

Tags: