शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी शेतकरी संघटना आणि भारतीय कृषक समाजातर्फे सोमवारपासून बेळगावात बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले.

कळसा-भांडुरा योजनेचे काम त्वरित सुरु करावे, २०२१-२२ या वर्षासाठीचा उसाचा दर जाहीर करावा, केंद्राने लागू केलेले कृषी सुधारणा कायदे रद्द करावे, ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण करू नये आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटना आणि भारतीय कृषक समाजातर्फे सोमवारपासून बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले. यावेळी निदर्शक शेतकऱ्यांनी भजने गायली. 
यावेळी बोलताना शेतकरी नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली. सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. कळसा-भांडुरा योजनेचे काम त्वरित सुरु करावे, अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या नागरिकांना तातडीने भरपाई द्यावी, २०२१-२२ या वर्षासाठीचा उसाचा दर जाहीर करावा, केंद्राने लागू केलेले कृषी सुधारणा कायदे रद्द करावे, ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण करू नये आदी मागण्या त्यांनी केल्या.
यावेळी शेतकरी संघटना आणि भारतीय कृषक समाजाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.


Recent Comments