एकाच महिन्यात २ सत्र परीक्षा घेण्याच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या निर्णयाच्या विरोधात बेळगावात सोमवारी विध्यार्थ्यानी एल्गार पुकारला. हा निर्णय रद्द न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही विध्यार्थ्यानी दिली.

होय, बेळगावातील राणी चन्नम्मा विद्यापीठ केवळ एकाच महिन्यात २ सत्र परीक्षा घेण्यासाठी पुढे सरसावले आहे. या निर्णयाला विध्यार्थ्यानी आधीपासूनच प्रखर विरोध केला आहे. परंतु विद्यापीठाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सोमवारी २००हुन अधिक विध्यार्थ्यानी विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या दालनासमोर धरणे धरली. विद्यापीठाने एकाच महिन्यात २ सत्र परीक्षा घेण्याचे ठरविल्याने विध्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही.
शिवाय ज्या काळात या परीक्षा होणार आहेत, त्याच काळात पीएसआय पदाच्या शारीरिक चाचण्या आणि एसडीओ पदाच्या लेखी परीक्षाही होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने नितीन बदलावा अशी मागणी निदर्शक विध्यार्थ्यानी यावेळी केली.
यावेळी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनस्थळी येऊन विद्यार्थ्यांची समजूत घालून निदर्शने मागे घेण्याची सूचना केली. मात्र ती मान्य न करता विध्यार्थ्यानी कुलगुरूंनी येऊन आश्वासन द्यावे असा हट्ट धरला.
आक्रमक होत विध्यार्थ्यानी विद्यापीठाने परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली. ती मान्य न केल्यास पुढे होणाऱ्या परिणामांना राणी चन्नम्मा विद्यापीठच जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला.


Recent Comments