बेळगाव महानगरपालिकेत बहुमत मिळाल्यानंतर भाजपच्या खासदार आणि आमदारांना नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांशी आज संवाद साधला.

नुकत्याच जाहीर झालेल्या पालिका निवडणूक निकालात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यानंतर आज, रविवारी भाजप खासदार आणि आमदारांनी आपल्या नगरसेवकांशी संवाद साधला. टिळकवाडीतील मिलेनियम गार्डनमध्ये झालेल्या परस्पर परिचय-संवाद कार्यक्रमात खा. मंगल अंगडी, बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील, उत्तरचे आ. अनिल बेनके, भाजपचे नवनिर्वाचित ३५ नगरसेवक आणि २७ संघ-संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी शहरातील संघ-संस्थांना भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्यात आणि शहर विकासात नगरसेवकांची जबाबदारी यावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, बेळगावात शहराच्या विकासासाठी करावयाच्या कामांची यादी तयार केली आहे. त्यासाठी निधी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे.
बेळगाव पालिकेवर भाजपने मिळवलेला हा पहिलाच विजय. आता सत्तेचा सुकाणू हाती आल्यावर भाजप शहरात कोणती विकासकामे करणार हे पहावे लागेल.


Recent Comments