विजापूर जिल्ह्यातील तालिकोटे तालुक्यातील भंटनूर येथे श्री गौरी–गणेशोत्सव आणि श्री जटीन्गेश्वर यात्रेनिमित्त वजन उचलण्याची स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत तालिकोटे तालुक्यातील नागूरच्या शिवराज गुंडकनाळ यांनी १५० किलो वजन उचलून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर बसवण बागेवाडी तालुक्यातील मनगुळीच्या परशुराम यर्नाळ यांनी १४० किलो वजनी दगड उचलला. तालिकोटे तालुक्यातील भंटनूरचे पैलवान हनुमंतराव वालीकार यांनी १०० किलो वजनाचे पोटे उचलून उठाबश्या काढल्या. विजेत्यांना क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा संघ आणि श्री जटीन्गेश्वर यात्रा महोत्सव कमिटीच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


Recent Comments