समग्र जलसिंचन योजना अमलात आणण्याच्या मागणीसाठी विजापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० रोखून धरत आंदोलन केले.

विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील होरती गावाजवळ जेडीएस नेते बी. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून रेवणसिद्धेश्वर जलसिंचन योजना तातडीने राबविण्याची घोषणा देत मागणी केली. 
इंडी तालुक्यातील तलावात पाणी उपलब्ध करून सर्व जलसिचन योजना राबविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून निदर्शक शेतकऱ्यांची समजूत घातली आणि वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. यावेळी निदर्शकांतर्फे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी याना निवेदन देण्यात आले.


Recent Comments