खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथील माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगूळकर यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथील माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगूळकर यांना चिक्कोडी येथे नुकत्याच झालेल्या समारंभात नॅशनल डेव्हलपमेंट फौंडेशन आणि हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यावतीने आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सवनूर, कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक महेश मेघन्नावर, माजी खासदार अमरसिंह पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments