मी भाजपमध्ये येण्यासाठी मला पैशांची ऑफर होती. पण मी ती नाकारली असे सांगून खळबळ उडवून दिलेल्या आ. श्रीमंत पाटील यांनी बोलण्याच्या भरात हे विधान केले असावे अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे.

अथणी येथील सत्यप्रमोद नगरात रविवारी वाल्मिकी समुदाय भवनाची पायाभरणी केल्यानंतर पत्रकारांनी याबाबत छेडले असता सवदी यांनी, आ. पाटील यांनी रागाने हे विधान केले आहे असे वाटत नाही. बोलण्याच्या भरात ते बोलून गेले असावेत असे सांगितले. त्यांचे हे विधान मी वृत्तपत्रात वाचले आहे. त्यांची माझी भेट झालेली नाही. त्यांना पैसे देण्यास कोण गेले होते, कोण अमिश दाखवले याबाबत त्यांनी स्पष्ट काहीच सांगितलेले नाही. माणसाला सत्ता, अधिकार कायमचा मिळत नाही. संधी मिळेल तेंव्हा सदुपयोग करून घ्यायला हवा. ते असे का बोलले याबात त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर चर्चा करेन असे सवदी म्हणाले. एकंदर, आ. श्रीमंत पाटील यांच्या गौप्यस्फोटाने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली आहे हे मात्र खरे.


Recent Comments