येत्या सोमवारपासून सुरु होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना भरपाई देण्यासाठी सरकारवर दबाव आणणार आहोत असे प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

कर्नाटक विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून बेंगळूरच्या विधानसौधमध्ये सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर गोकाकमधील हिल गार्डन येथे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विधिमंडळ अधिवेशनात कोणते मुद्दे, प्रश्न मांडायचे याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यात प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना भरपाईची मागणी करणे, म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरणी आवाज उठवणे आदी मुद्द्यांचा समावेश आहे.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा घडवून न आणताच वटहुकूम जारी करून सरकार हे दोर्न राबविण्यास पुढे झाले आहे. हा निर्णय चुकीचा आहे. या धोरणावर दोन्ही सदनांत सविस्तर चर्चा झाली पाहिजे. त्यातील त्रुटी दूर केल्या पाहिजेत. या मुद्यावरही अधिवेशनात आवाज उठवण्यात येईल असे आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
एकंदर अधिवेशनात सरकारच्या चुकांवर आवाज उठविणार असल्याचे आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.


Recent Comments