सर्व दानांमध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आणले जाते. त्यामुळेच बेळगावातील कॅम्पमधील मारुती मंदिरात शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आणि असोसिएशनचे सदस्य भावेश सोळंकी यांच्या स्मरणार्थ देशभरातील ५०० जिल्यांत शनिवारी एकाचदिवशी, एकाचवेळी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्याचप्रमाणे बेळगावातही कॅम्पमधील श्री मारुती मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ५०हून अधिकजणांनी रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवला.
यासंदर्भात ‘आपली मराठी’सोबत बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कलवार म्हणाले, असोसिएशनतर्फे आज एकाचदिवशी रक्तदान शिबीर, रोपवाटप कार्यक्रम, वृद्धाश्रमांना आर्थिक मदत असे उपक्रम राबवत आहोत. आगामी काळातही हे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील.
याप्रसंगी राज्य विभागाध्यक्ष भरत राठोड, जिल्हाध्यक्ष शिवराज राजपूत, अशोक पावले, कुणाल शहा, अनिल मोहरट्टी तसेच असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments