Belagavi

बेळगावात वन खात्यातर्फे वन हुतात्मादिन 

Share

 वनसंपत्तीचे रक्षण करताना त्याग आणि बलिदान दिलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ११ सप्टेंबरला राष्ट्रीय वन हुतात्मा दिन पाळण्यात येतो. बेळगावातही आज वन खात्यातर्फे राष्ट्रीय वन हुतात्मादिन पाळण्यात आला.

होय, जोधपूरचे महाराज अभयसिंग यांच्या नव्या राजवाड्यासाठी केजर्ली प्रांतातील झाडे तोडत होते. त्यावेळी बिष्णोई समाजातील लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे राजाच्या सैनिकांनी विरोध करणाऱ्या बिष्णोई समाजाच्या ३६३ स्त्री-पुरुष आणि बालकांची हत्या केली. तो दिवस होता ११ सप्टेंबर १७३०. बिष्णोई समाजाच्या लोकांनी वनसंपत्तीच्या रक्षणासाठी केलेल्या त्याग आणि बलिदानाची आठवण म्हणून भर सरकारने ११ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन हुतात्मादिन म्हणून घोषित केला. या पार्श्वभूमीवर शनिवारी बेळगावात जिल्हा वन खाते मुख्यालयात वन खात्यातर्फे वन हुतात्मादिन साजरा करण्यात आला. यावेळी डीएफओ हर्ष भानू यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी हवेत ३ फेऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.

यावेळी बोलताना डीएफओ हर्ष भानू म्हणाले, वनसंपदा, मातृभूमी आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी त्याग, बलीदान दिलेल्या वन कर्मचाऱ्यांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. आमच्या खात्यात काम करणाऱ्या शंकर मुडलगी, बसरीकट्टी, हंपय्या, खानापुरी, रंगनगौडा आदी कर्मचाऱ्यांनी वनरक्षणासाठी बलीदान दिले आहे. त्यांचे बलिदान अमूल्य आहे.  याप्रसंगी डीएफओ सुरेश कल्लोळकर, वनाधिकारी एम. बी. कुसनाळ, शिवानंद मगदूम, वासिम तेनगी, आएफओ विनयगौडर, प्रशांत जैन, एम. बी. किल्लेदार आदी उपस्थित होते.

 

 

Tags: