Belagavi

आझम नगरात झाक्रिया मशिदीत कोरोना लसीकरण

Share

 कोरोना लसीकरणास बेळगावात आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी आझम नगरात झाक्रिया मशिदीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान राबवण्यात आले.

आझमनगरातील झाक्रिया मशीद कमिटीतर्फे शनिवारी दुसऱ्यांदा कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना लस देण्यात आली. यासंदर्भात ‘आपली मराठी’ला माहिती देताना जमात अध्यक्ष अक्सल बागवान म्हणाले, अजून बऱ्याच लोकांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे आमच्या जमातीतर्फे दुसरे लसीकरण शिबीर घेण्यात आले. आरोग्य खाते आणि सरकार लोकांचे प्राण वाचविण्यासाठी उत्तम कार्य करत आहे.

त्यामुळे सर्वानीच सरकारचे नियम पाळायला पाहिजे. कोरोनापासून बचावासाठी लशीशिवाय सध्या दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सर्वानी लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. बाईट यानंतर बोलताना समाजसेवक इम्रान फतेखान म्हणाले, परिसरातील लोकांसाठी आमच्या जमाततर्फे लसीकरण शिबीर घेतले आहे. त्याचा लाभ सर्वानी घ्यावा. तसेच स्वच्छ स्वास्थ्य, सुंदर बेळगावसाठी योगदान दिले पाहिजे असे सांगितले.

 

Tags: