Belagavi

युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण मोहिमेचे उदघाटन

Share

 शाळा आणि महाविद्यालयीन युवतींना स्वरक्षणाचे धडे देण्याच्या मोहिमेचे बेळगावात बुधवारी गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.

बेळगावातील कंग्राळी के. एच. येथील कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात बुधवारी आयोजित समारंभात युवतींसाठी कराटे व अन्य स्वरक्षणाचे धडे देण्याच्या अभियानाचे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी केएसआरपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार होते. याप्रसंगी शाळा-महाविद्यालयीन युवतींनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिकेही सादर केली.

 

Tags: