मनपा निवडणुकीत जिंकून आल्यावर विजयोत्सव अर्ध्यावर सोडून अनोळखीच्या अंत्यसंस्कारासाठी उमेदवाराने धाव घेतली. ही घटना सोमवारी बेळगावात घडली.

होय, बेळगाव पालिकेची निवडणूक लढवलेल्या सर्वच उमेदवारांसाठी कालचा दिवस अग्निपरीक्षेचा होता. सगळेच उमेदवार मतमोजणी केंद्राजवळ थांबून आपापले भवितव्य अजमावत होते. त्याचवेळी प्रभाग क्र. ७मधून अपक्ष उमेदवार शंकर पाटील विजयी झाल्याची घोषणा केंद्रातून करण्यात आली.
त्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. सगळेजण जल्लोष करू लागले. एवढ्यात, ‘एका अनाथ, अनोळखीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही नाहीत’ असा फोन शंकर पाटील याना आला. त्यांनी लागलीच विजयोत्सव अर्ध्यावर सोडून देत स्मशानभूमीत धाव घेऊन त्या अनाथ व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. कोविड काळात कोरोनाने कोणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या घरचे लोकही अंत्यसंस्कारासाठी धजावत नव्हते. त्यावेळीही शंकर पाटील यांनी एक पथक स्थापन करून १००हुन अधिक जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.


Recent Comments