Vijayapura

दुथडी भरून वाहणारा नाला दोराच्या साह्याने केला पार

Share

शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी घरी येताना जीवाची पर्वा न करता दुथडी भरून वाहणारा नाला दोराच्या साह्याने पार केल्याची घटना विजापूर जिल्ह्यात घडली आहे. 

विजापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या २ दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे ओढे-नाले भरून वाहत आहेत. हुनशाळ आणि यलगोडू गावांदरम्यानचा नाल्यालाही पूर येऊन तो दुथडी भरून वाहत आहे.

या दरम्यान यलगोडू गावात शेतीच्या कामांसाठी गेलेल्या हुनशाळ गावच्या शेतकऱ्यांना घरी परत येताना अडचण निर्माण झाली होती. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता, दोराचा वापर करून भरून वाहणारा नाला पार केला. जीव धोक्यात घालून वाहता नाला पार करणाऱ्या या शेतकऱ्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 

Tags: