Belagavi

किशोरवयीन मुलांच्या आरोग्याबाबत जागृती कार्यक्रम

Share

बेळगावात मंगळवारी इनरव्हील क्लबतर्फे किशोरवयीन मुलांच्या आरोग्याबाबत जागृती कार्यक्रम आयोजित केला होता.

भरतेश हायस्कुलच्या सभागृहामध्ये इनरव्हील क्लब आयोजित ‘दर्श’ नामक किशोरवयीन मुलांच्या आरोग्याबाबत जागृती कार्यक्रमाचे उदघाटन खा. मंगल अंगडी यांनी दीप प्रज्वलनाने केले. त्यानंतर बोलताना त्यांनी, किशोरवयीन मुलांच्या आरोग्याबाबत पालकांत जागृती होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने इनरव्हील क्लबने हा जागृती कार्यक्रम आयोजित करून चांगला उपक्रम राबवला आहे. त्याचा सर्वानी लाभ घ्यावा असे खा. अंगडी यांनी सांगितले.

इनरव्हील इव्हेंट चेअरमन स्मिता दळवी म्हणाल्या, पालक किशोरवयीन मुलींचीच जास्त काळजी घेतात. मात्र किशोरावस्थेतील मुलांची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातील फरक समजून घेत त्यांचे समुपदेशन केले पाहिजे. मुली आणि महिलांना कसा मान द्यावा याचे धडे दिले पाहिजेत.भरतेशचे चेअरमन राजीव दोड्डन्नावर म्हणाले, विध्यार्थी जीवनात मुलांची चांगली संगत ठेवली पाहिजे. त्यामुळे चुकीच्या मार्गावर जाणे टाळले जाईल. त्यासाठी पालकांनी त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.

याप्रसंगी श्रीपाल खेमलापुरे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष डॉ. सुषमा शेट्टी, डॉ. सविता कद्दू, डॉ. कमलाकर आचरेकर, डॉ. मिलिंद हलगेकर आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: