सरकारच्या निर्णयाप्रमाणे विजापूर जिल्ह्यात सोमवारपासून सहावी ते आठवीचे वर्ग भरविण्यात आले. कोरोनाची भीती मनात बाळगूनच विध्यार्थी शाळेत हजर झाले.

राज्यात कोरोनाचा संसर्गदर घटल्याने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग याआधीपासूनच भरविण्यात येत आहे. त्यानंतर आज, ६ सप्टेंबरपासून सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग भरविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार आजपासून हे वर्ग भरविण्यात आले. तत्पूर्वी वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सामाजिक अंतर पाळताना एका बेंचवर एक व दोन विध्यार्थ्यांना बसवून वर्ग भरविण्यात आले. सुमारे ५०% विद्यार्थ्यांनी सोमवारी हजेरी लावली.
विजापुरात सर्वात मोठी शाळा असलेल्या रवींद्रनाथ टागोर शाळेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी शाळा सुरु करण्यासंदर्भात सांगितले की, शाळेत येणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. तसेच सामाजिक अंतर राहील अशा पद्धतीने आसनव्यवस्था केली आहे. शाळा भरविताना सरकारच्या कोविड मार्गसूचीचे पालन करण्यात येत आहे.


Recent Comments