Belagavi

बेळगाव मनपात ३६ जागांसह भाजपला स्पष्ट बहुमत; काँग्रेस, समितीला धक्का !

Share

तीव्र कुतूहल निर्माण केलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून विजय संपादन केला आहे. काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला अनपेक्षित धक्का बसला असून, एआयएमआयएमने जागा जिंकत खाते खोलले आहे. जेडीएस आणि आम आदमी पार्टीला खातेही खोलता आले नाही. चला पाहुयात बेळगावच्या वार्ड वॉरचा हा पोलिटिकल रिपोर्ट…!

होत, बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. कारण यावेळी प्रथमच राजकीय पक्षांनी पक्षीय पातळीवर ही निवडणूक लढवली. ५८ वार्डांत ३८५ उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीसाठी शुक्रवारी ३ सप्टेंबरला मतदान घेण्यात आले आणि सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. भाजपने अपेक्षेहून अधिक ३६ जागा जिंकून नवा इतिहास निर्माण केला. इतके दिवस बालेकिल्ला असलेली बेळगाव मनपा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हातातून काढून घेण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. विजयी उमेदवारांनी ‘आपली मराठी’सोबत बोलताना असा आनंद व्यक्त केला.

बेळगाव पालिका जिंकण्याचा विश्वास असलेली काँग्रेस पिछाडीवर राहिली. काँग्रेसला केवळ ९ जागा जिंकता आल्या. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा मुखभंग झाला आहे. काँग्रेसमधून जिंकलेल्या उमेदवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त केला. जागांवर समाधान मानावे लागले आहे. जेडीएस आणि आम आदमी पार्टीला खातेही खोलता आले नाही. एमआयएमचा १ उमेदवार विजयी झाल्याने या पक्षाने बेळगाव मनपात खाते खोलले आहे. निवडून आलेल्या उमेदवारांनी या प्रकारे हर्ष व्यक्त केला.

एकंदर बेळगाव महानगर पालिका निवडणुकीत भाजपने कमाल केली आहे. ३३ जागांचा जादुई एकदा ओलांडत ३६ जागा या पक्षाने मिळवल्या आहेत. विकासाच्या मुद्यांवर मतदारांनी भाजपला जवळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. आता भाजप बेळगाव शहराचा कितपत विकास करणार हे पहावे लागेल.

 

Tags: