Belagavi

११ महिन्यांच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Share

 कौटुंबिक कलहाला कंटाळून महिलेने ११ महिन्यांच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मन्निकेरी गावात रविवारी सकाळी घडली

होय, पती-पत्नीमधील मतभेद आणि कौटुंबिक त्रासाला कंटाळून मन्निकेरी येथील एका महिलेने आपल्या ११ महिन्यांच्या तान्हुल्यासह विहिरीत उडी टाकून आपले जीवन संपविले. ही घटना आज सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. कल्पना मोहन गुडाजी, वय ३१ असे या महिलेचे नाव आहे. दोनच वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. तिला ११ महिन्यांचे मूल होते.त्या मुलासह तिने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु असून, तपासनंतरच सत्य बाहेर येणार आहे.

 

 

Tags: