Belagavi

बेळगाव मनपा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

Share

 बेळगाव महानगरपालिकेचा निकाल उद्या, सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. निकाल ऐकण्यासाठी सर्वच उमेदवार त्यांचे समर्थक उतावीळ झाले असून, सकाळी १० वाजण्याच्या आत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

यावेळी प्रथमच राजकीय पक्षांनी आपापल्या चिन्हांवर बेळगाव मनपा निवडणूक लढवली आहे. शुक्रवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर आता सर्वाना निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. बेळगावातील कॅम्प परिसरातील बी. के. मॉडेल हायस्कुलमध्ये सोमवारी सकाळी ७ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. यासाठी एका रूममध्ये २ टेबल लावण्यात आले आहेत. एकूण १२ रूममध्ये २४ टेबल लावण्यात आले आहेत. एकाचवेळी २४ प्रभागातील मतमोजणी करण्यात येणार आहे. दुपारी १२ च्या सुमारास सर्व ५८ प्रभागाचे चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.बेळगाव मनपा निवडणुकीत एकूण ३८५ उमेदवार आपले भवितव्य अजमावीत आहेत. भाजपने ५५ प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसने ४५, महाराष्ट्र एकीकरण समितीने २१, जेडीएस-११, आम आदमी पार्टी-२७, एमआयएम-७, उत्तम प्रजाकीय-१, एसडीपीआय-१उमेदवार उभा केला आहे. अपक्षांची संख्या सर्वाधिक, २१७ इतकी आहे. भाजप आणि काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समिती नेहमीप्रमाणे बाजी मारेल असा अनेकांचा होरा आहे. प्रत्यक्षात कोण, कशी बाजी मारतो हे उद्याच समजणार आहे.

 

 

 

Tags: