Belagavi

बेळगावात जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान

Share

 बऱ्याच अवधीनंतर उद्यापासून सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे विध्यार्थी आणि शाळांकडे अधिक लक्ष देण्याचा संकल्प आजच्या शिक्षकदिनी करूया असे सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस जगदीशगौडा पाटील यांनी सांगितले.

गट आणि जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे रविवारी बेळगावातील महंत भवनात जिल्हास्तरीय शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस जगदीशगौडा पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षण खात्याचे अधिकारी शिक्षक, कर्मचाऱ्यांना चांगले मार्गदर्शन करत आहेत. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवलेल्या शिक्षकांनी भविष्यात आणखी चांगली सेवा बजावून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवण्याचे ध्येय ठेवावे असे आवाहन केले.

यावेळी शोभा व्ही, वीणा कुलकर्णी, कमला स्वरमंडल, नारायण करंबळकर, रमेश चिक्कूम्बी, बी. जे. दबाडी, मंजुनाथ मडीवाळ याना पूर्व प्राथमिक विभागात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उच्च प्राथमिक विभागात प्रकाश हुलमनी, एस. पी. मोडक, ए. एच. शिरगावी, सदानंद पाटील, तिप्पनायक एल., मंजुळा शेट्टर, रवी बुलबुले यांना मान्यवरांच्याहस्ते जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी निवृत्त शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. एसएसएलसी परीक्षेवेळी प्रामाणिक सेवा बजावल्याबद्दल स्काऊट अँड गाईड्स शिक्षकांना सेवर्तन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डाएटचे प्राचार्य एम. एम. सिंधूर, गट शिक्षणाधिकारी वाय. जे. बजंत्री आदी यावेळी उपस्थित होते.

 

Tags: