केंद्रीय अभ्यास पथकाने खानापूर तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रविवारी खानापूरला भेट देऊन पाहणी केली.

अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीची भेट देऊन पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचे रविवारी खानापुरात आगमन झाले. केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सुशील पाल यांच्या नेतृत्वाखालील या ३ सदस्यांच्या पथकाने काही नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली. मलप्रभा नदीवरील पूल, पोलीस प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणी पथकाने भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालिकोटी उपस्थित होत्या. दरम्यान, केंद्रीय पथकाच्या दौऱ्यासंदर्भात महसूल सचिवांनी सांगितले की, अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात ७६५ कोटींचे पीक आणि मूलभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे केंद्राला कळविल्याचे महसूल मंत्र्यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगितले होते. सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या बेळगाव जिल्ह्याला ३ सदस्यांचे केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार आहे असे सांगितले होते.
यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, हेस्कॉम, कृषी आणि अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments