Chikkodi

माहिती हक्क कार्यकर्त्यावर मानहानीचा दावा करणार : नगरसेवक बेपारी 

Share

 सार्वजनिक जागेत बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करणाऱ्या माहिती हक्क कार्यकर्त्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा चिक्कोडीचे नगरसेवक इरफान बेपारी यांनी दिला आहे.

चिक्कोडी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना नगरसेवक इरफान बेपारी म्हणाले, माहिती हक्क कार्यकर्ता श्रीनाथ घट्टी यांनी चिक्कोडी शहरातील प्रभाग क्र. ८ मधील नगरपालिकेच्या जागेत परवानगी न घेताच नगरसेवकाने अवैध बांधकाम केल्याचा आरोप केला आहे. त्याचा माझ्याशी दुरान्वयानेही संबंध नाही. चिक्कोडी पालिकेकडून भुभाडेपट्ट्यावर जागा घेतलेल्या राजू रोकडे यांनी पालिकेची परवानगी घेऊनच बांधकाम सुरु केले आहे. त्याचा माझा काहीच संबंध नाही. मात्र माहिती हक्क कार्यकर्ते श्रीनाथ घट्टी यांनी विनाकारण माझे नाव यात गोवून बदनामी चालवली आहे असे नगरसेवक इरफान बेपारी यांनी सांगितले.

यावेळी पालिकेचे माजी उपाध्यक्ष गुलाबहुसेन बागवान, पालिका सदस्य साबीर जमादार, मज्जीद बेपारी आदी उपस्थित होते.

 

Tags: