गांजा विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका युवकाला विजापूर अबकारी पोलिसांनी अटक केली. अमोघसिद्ध यमनाप्पा लोगावी असे त्याचे नाव आहे.
विजापूर जिल्हयातील तिकोटा तालुक्यातील रत्नापूर क्रॉसजवळ अमोघसिद्ध लोगावी गांजा विकण्यासाठी दुचाकीवरून आल्याची खबर अबकारी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळी ४ किलो वाळलेला गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत १ लाख, १० हजार रु. होते. अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ, उपयुक्त सय्यद अजमल अफ्रिन यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक एच. एस. वज्जरमट्टी, अबकारी निरीक्षक महादेव पुजारी यांनी ही कारवाई केली.
Recent Comments