Belagavi

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात सर्व उपाय : डॉ. शशिधर मुन्याळ

Share

 कोविडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य खात्याने बेळगाव जिल्ह्यात सर्व उपाययोजना केली आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिधर मुन्याळ यांनी दिली

बेळगावात शनिवारी ‘आपली मराठी’सोबत बोलताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिधर मुन्याळ म्हणाले, कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य खात्याने बेळगाव जिल्ह्यात सर्व उपाय योजले आहेत. सरकारी व खासगी इस्पितळांच्या सहभागाने तिसऱ्या लाटेचा समर्थपणे सामना करण्यासाठी पावले उचलली आहेत. बीम्स इस्पितळात लहान मुलांसाठी १५०हुन अधिक बेड्सची व्यवस्था केली आहे.

तिसऱ्या लाटेचा दुष्परिणाम लहान मुलांवर अधिक प्रमाणात होणार असल्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, जिल्ह्यात ६२% लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे. मोठ्या मुलांचे आणि शिक्षकांचे लसीकरणही करण्यात आले आहे. त्याशिवाय तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सावधगिरीचा उपाय करण्यात येत आहेत.

लोकांनीही तिसरी लाट येऊ नये यासाठी दक्ष राहून आरोग्य खात्याला सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी १८ वर्षांवरील सर्वानी लस घेतली पाहिजे. सतत मस्क घालून सामाजिक अंतर पाळून कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन केले पाहिजे. तरच तिसऱ्या लाटेचा समर्थपणे सामना करता येईल असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिधर मुन्याळ यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

Tags: