अधिकाऱ्यांनी दिलेल्या जुन्या मतदारयादीला आक्षेप घेत मतदान होऊ न देण्याची भूमिका उमेदवाराने घेतल्याने प्रभाग क्र. ४५मधील बूथ क्र. १ वर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला.
प्रभाग ४५ मधील काँग्रेस उमेदवार राजश्री नाईक यांनी आपल्याला जुनी मतदारयादी दिल्याचे सांगत सेक्टर ऑफिसरना घेराव घातला. नवी मतदारयादी मिळेपर्यंत मतदान घेऊ नये यावर त्या अडून बसल्या. फ्लो
यासंदर्भात ‘आपली मराठी’शी बोलताना उमेदवार राजश्री नाईक म्हणाल्या, निवडणूक अधिकाऱ्यांनी मला जुनी मतदारयादी दिली आहे. भाजप उमेदवाराला मात्र नवी यादी दिली आहे. त्याशिवाय आमच्या मतदारांना निवडणूक कर्मचारी परत पाठवीत आहेत. एक तर मला नवी यादी द्या, नाही तर मतदान थांबवा अशी मागणी त्यांनी केली. बाईट
एकंदर मतदारयादी देताना राजकारण झाले आहे असा आरोप निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात काँग्रेस उमेदवार राजश्री नाईक यांनी यावेळी केला.
Recent Comments