बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना, यावेळीही मनपावर महाराष्ट्र एकीकरण समितीचाच महापौर–उपमहापौर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
होय, बेळगावातील प्रभाग क्र. १५ मधील संभाजी गल्लीतील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेतील मतदान केंद्रात शुभम शेळके यांनी शुक्रवारी मतदान केले. फ्लो
मतदानानंतर ‘आपली मराठी’सोबत बोलताना शुभम शेळके सांगितले की, बेळगावात राजकीय पक्ष आपले अस्तित्व राखण्यासाठी झगडत आहेत. मतदान सुरु असताना या पक्षांचे लोक पक्षचिन्ह दाखवून प्रचार करत आहेत हे चुकीचे आहेत. हा गोंधळ टाळण्यासाठी लोकांनी घरात बसून न राहता बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. त्याचप्रमाणे यावेळीही मनपावर महाराष्ट्र एकीकरण समितीचाच महापौर-उपमहापौर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाईट
त्यानंतर शुभम शेळके यांनी मतदारांना नाव, या. क्र. चा तपशील असलेल्या चिठ्ठ्या वाटल्या. तसेच मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी म. ए. समितीचे नेते उपस्थित होते.
Recent Comments