भाजप सरकार इंधन दरवाढ कमी करण्याची लक्षणे काही दिसेनात. त्यामुळे लोकांनीच आता या सरकारविरोधात पेटून उठले पाहिजे असे आवाहन केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी केले.
गोकाक येथे पत्रकारांशी बोलताना आ. जारकीहोळी म्हणाले, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. काँग्रेसनेही इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात देशभर आंदोलने केली. तरीही भाजपचे केंद्र सरकार दरवाढ कमी करण्याची कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे जनतेनेच आता त्याविरुद्ध बंड करायला हवे असे आवाहन त्यांनी केले.
गोकाक शहरात चोरीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस बंदोबस्त वाढवला पाहिजे. पोलिसांनी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त केले पाहिजेत. शिवाय त्यांची संख्या वाढवली पाहिजे. तरच वाढत्या चोऱ्यांना आळा बसेल. यासंदर्भात गोकाक डीवायएसपीना पत्र लिहिणार असल्याचे आ. जारकीहोळी यांनी सांगितले.
Recent Comments