Vijayapura

तालिकोटीत महिलेचे ३८ ग्रॅमचे मंगळसूत्र लांबवले

Share

बसच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवून नेल्याची घटना विजापुर जिल्ह्यातील तालिकोटी बसस्थानकावर घडली.

होय, बस येण्याची वाट पहात असलेल्या एकट्या महिलेला हेरून एका चोरट्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले. ही  घटना १ सप्टेंबरला घडली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. रेणुका पाटील नामक महिलेच्या या मंगळसूत्राची वजन ३८ ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे दीड लाख रु. आहे. महिला तालिकोटीहून दोरहळ्ळीला जाण्यासाठी बसची वाट पहात बसली होती. यासंदर्भात तालिकोटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Tags: