बेळगावचा विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. जाती–धर्म, भाषा हे भेद सोडून पक्षाचे काम करत आहे असे आ. अनिल बेनके यांनी सांगितले.
बेळगाव मनपा निवडणुकीसाठी भाजप आ. अनिल बेनके यांनी शुक्रवारी अंजनेय नगरातील प्रभाग क्र. ३६ मधील मतदान केंद्र क्र. २४७ मध्ये मतदान केले. फ्लो
त्यांनतर पत्रकारांशी बोलताना आ. बेनके म्हणाले, यावेळी इच्छुकांची संख्या अधिक आहे. एका प्रभागात १० ते १५ उमेदवार आहेत. मात्र ‘ सब का साथ, सब का विकास’ हेच आमचे ध्येय आहे. शहरातील मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केले. बेळगावात भाजपचे आम्ही २ आमदार असून आमच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. आम्ही केलेल्या विकासकामांमुळे मतदार आम्हाला मते देणार आहेत. अपक्षांची संख्या जास्त असल्याचा आम्हाला फायदा होणार आहे. अपक्ष केवळ निवडणुकीवेळी येतात. आमचे उमेदवार आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांत फरक आहे असे आ. बेनके यांनी सांगितले.
Recent Comments