Belagavi

स्वब टेस्टसाठी विध्यार्थी-पालकांच्या बीम्ससमोर रांगा 

Share

 सरकारी निवासी शाळांच्या प्रवेशासाठी कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे स्वब टेस्ट करून घेण्यासाठी विध्यार्थी आणि पालकांची बेळगावातील बीम्स चाचणी केंद्रासमोर गुरुवारी रांग लागल्याचे पहायला मिळाले.

कोरोनाच्या थैमानामुळे इतके दिवस शाळा बंद राहिल्या आणि ऑनलाइनच्या माध्यमातूनच वर्ग घेण्यात आले. आता राज्यात कोरोना संसर्गदर कमी झाल्याने सरकारने शाळा भरविण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ मोरारजी व अन्य निवासी शाळाही भरवण्यात येणार आहेत. पण त्याच्या प्रवेशासाठी कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावात गुरुवारी विध्यार्थ्यांना घेऊन पालकांनी बीम्स चाचणी केंद्रासमोर चाचणीसाठी गर्दी केली.  यावेळी ‘आपली मराठी’सोबत बोलताना पालक सिद्दप्पा ऐहोळे यांनी सांगितले की, मुलांना मोरारजी निवासी शाळेत प्रवेश घेतला आहे, पण शाळेकडून आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल मागण्यात आल्याने मुलांची चाचणी करण्यासाठी येथे आलो आहोत. केवळ तापाची चाचणी केली असती तर बरे झाले असते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

सरकारने स्वब टेस्ट करण्याची सक्ती केली हे एका दृष्टीने सर्वांसाठी चांगलेच आहे अशा प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या. एकंदर निवासी शाळा प्रवेशासाठी सरकारने स्वब टेस्टची सक्ती केली हे विद्यार्थ्यांसाठी चांगलेच आहे असे म्हणावे लागेल.

 

 

 

Tags: