Vijayapura

कॅन्सर पीडित मुस्लिम महिलांना मदतीची योजना जुनीच : मंत्री जोल्ले

Share

राज्यातील कॅन्सर पीडित मुस्लिम महिलांना लाख रु सहाय्यधन देण्याची योजना आधीचीच आहे, ती मी घोषित केलेली नाही असे धर्मादाय आणि हज वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी स्पष्ट केले.

विजापुरात गुरुवारी कोरोना वॉरियर्सच्या सत्कार समारंभात भाग घेतल्यानंतर बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, या योजनेबाबत अनेकांचा गैरसमज आहे. हज आणि वक्फ खात्याने २००९मध्येच या संदर्भात आदेश जारी केला आहे. त्यानुसार कॅन्सर पीडित मुस्लिम महिलांना उपचारांसाठी १ लाख रु देण्यात येतात. हे आतापर्यंत बऱ्याच लोकांना माहित नव्हते. मी नव्याने याची घोषणा केलेली नाही. मी खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर खात्याच्या योजनांची माहिती देताना या योजनेची माहिती दिली इतकेच असे जोल्ले म्हणाल्या.

आम्ही कधी हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करत नाही. मुख्यमंत्री निधी असो व प्रधानमंत्री निधी असो, सर्वानाच समान मदत करतो. हिंदू महिलांनासुद्धा प्राणघातक रोगांच्या उपचारांसाठी आर्थिक सहाय्य केले जाते असे मंत्री जोल्ले म्हणाल्या.

 

Tags: