विरोधी पक्ष काँग्रेसचे येत्या २० वर्षांत नामोनिशाण मिटेल आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न साकार होईल अशी भविष्यवाणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी कथन केली.
हुक्केरी शहरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री कत्ती म्हणाले, कर्नाटकातील मुस्लिमांनी भाजपलाच मतदान केले पाहिजे. एमआयएमचे म्हणजे ते काही पाकिस्तानचे नव्हेत, भारतातच जन्मलेले मुस्लिम. महाराष्ट्र एकीकरण समितीला दूर ठेवण्यासाठी बेळगाव मनपा निवडणुकीत भाजपलाच मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. एमआयएम आणि म. ए. समितीचे ध्वज केवळ निवडणूक आली की, फडकू लागतात. आम्ही सतत विकासासाठी झटतो. त्यामुळे एकदा बेळगाव मनपात भाजपला सत्ता द्या असे ते म्हणाले. एमआयएम भाजपचा एजंट आहे का या प्रश्नावर, भाजप हा नेहमी लोकांचा आणि विकासाचा एजंट आहे. बेळगाव पालिकेत भाजप ३५हुन अधिक जागा जिंकेल. आमची म. ए. समिती सोबत कसलीही युती नाही असे कत्ती यांनी स्पष्ट केले.
बेळगाव पालिकेत काँग्रेस आणि म. ए. समिती मिळून कारभार चालवतात. या दोन्ही पक्षांना लोकांनी धडा शिकवायला हवा. ५ वर्षांत आम्ही विकास केला नाही तर आम्हाला घरी बसवा, बेळगावला केंद्र सरकारने १ हजार कोटी रु अनुदान दिले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप आणखी किमान २० वर्षे सत्तेत राहील. बेळगाव पालिकेतही आणखी २० वर्षे तो सत्तेत राहण्याची गरज आहे असे उमेश कत्ती यांनी सांगितले.
यावेळी हुक्केरी नगरपालिकेचे सदस्य महावीर निलजगी, भाजप नेते परगौडा पाटील, गुरु कुलकर्णी, रोहित चौगुला, महाबली सोलापूरे, संजय निलजगी, प्रज्ज्वल निलजगी आदी उपस्थित होते.


Recent Comments