बेळगाव महानगर पालिकेच्या ५८ प्रभागांसाठी उद्या मतदान होत आहे. यासाठी नेमलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या २ वर्षांच्या तान्हुल्यासह कामावर हजर होऊन सर्वांचेच लक्ष वेधले.
होय, शुक्रवारी होणाऱ्या मनपा निवडणुकीच्या मतदानाची पूर्वतयारी आज बेळगावात करण्यात आली. कॅम्पमधील बी. के. मॉडेल हायस्कुलच्या आवारात निवडणूक कर्मचाऱ्यांकडे ईव्हीएम व अन्य साहित्य सोपवून संबंधित मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. निवडणुकीसाठी सुमारे २ हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. यावेळी निवडणूक ड्युटीवर नेमलेली रूपा हिरेमठ ही महिला पोलीस कर्मचारी आपल्या २ वर्षांच्या तान्हुल्यासह इलेक्शन ड्युटीवर हजर झाली. तिची कर्तव्यनिष्ठा पाहून सर्वानीच तिची प्रशंसा केली.


Recent Comments