बेळगाव महानगर पालिका वार्ड नंबर 43 च्या भाजप उमेदवार वाणी विलास जोशी यांना मतदारातून उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अनेक ठिकाणी मंडळांच्या फलकांवर वाणी जोशी यांचा नामोल्लेख करून मतदारांनी जाहीर पणे पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे भाजप उमेदवार वाणी जोशी यांचा विजय निश्चिात असल्याची प्रतिक्रिया मतदारातून व्यक्त केली जात आहे.
वॉर्ड नंबर 43 मध्ये येणाऱ्या चिदंबर नगर, मृत्यूंजय नगर, s.v. रोड, भाग्यनगर, विद्यानगर, बुडा कॉलनी, आरपीडी रोड, टिळकवाडी परिसर आदी भागात भाजप उमेदवार वाणी जोशी यांना उस्फुर्त पाठिंबा मिळत आहे. मतदारांनी विकासाला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदार संघात वाणी जोशी यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. केवळ राजकारणामुळे मतदार संघात विकास कामे रखडली होती. मात्र भाजपचे आमदार अभय पाटील यांनी या भागात विकासाची गंगा आणली आहे. यापुढेही अशीच विकासकामे राबवुन आदर्श वार्ड निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत ‘भाजपला मतदान विकासाला मतदान’ अशी प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच मतदार संघात भाजपला उस्फुर्त पाठिंबा मिळाला आहे. या अनुषंगाने अनेक ठिकाणी असणाऱ्या युवक मंडळ, महिला मंडळ, आधी मंडळांच्या फलकांवर जाहीरपणे वाणी जोशी यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.
यामुळे एम प्लस एम चे धोरण आखून मतदारांची दिशाभूल करून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना मतदारांनी मतदानापूर्वी धडा शिकवला आहे. किरण सायनाक यांनी दोन वेळा सत्ता मिळवूनही नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास कामे केली नाहीत केवळ भाषेचे राजकारण करून नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे. आता यापुढे अशी परिस्थिती राहणार नाही विकास हा महत्त्वाचा मुद्दा असून याला भाजप उमेदवार सार्थ ठरणार आहेत अशी प्रतिक्रिया ही मतदारातून व्यक्त केली जात आहे. यामुळेच मंडळांच्या फलकांवर वाणी जोशी यांना जाहीर पाठींबा दर्शवला जात आहे. मिळणारा पाठिंबा भाजप उमेदवार वाणी जोशी यांच्या विजयाची नांदी आहे, अशी प्रतिक्रियाही मतदारातून व्यक्त केली जात आहे.
Recent Comments