Athani

अवैज्ञानिक स्थलांतराच्या निषेधार्थ नंदेश्वरला रास्ता रोको

Share

 पुरपीडितांच्या गावांचे अवैज्ञानिक पद्धतीने स्थलांतर केले जात असल्याच्या निषेधार्थ अथणी तालुक्यातील नंदेश्वर गावच्या ग्रामस्थांनी बुधवारी रास्ता रोको करून निदर्शने केली.

: अतिवृष्टीमुळे दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या गावांचे स्थलांतर सरकारकडून केले जात आहे. मात्र ते अवैज्ञानिक पद्धतीने केले जात असल्याच्या निषेधार्थ अथणी तालुक्यातील नंदेश्वर गावच्या ग्रामस्थांनी बुधवारी रास्ता रोको करून निदर्शने केली. नंदेश्वर गावातील ५००हुन अधिक पुरपीडितांनी अथणी-जमखंडी रस्त्यावरील वाहतूक बंद पडून रास्ता रोखून निदर्शने केली. पुनर्वसन केंद्र बदलण्याची मागणी निदर्शक ग्रामस्थांनी केली. 

रास्ता रोको आंदोलनासाठी अपेक्षेहून अधिक संख्येने जमल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्ता रोखल्याने दुतर्फा १ किमीहून अधिक लांब वाहनांची रांग लागली होती. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी निदर्शकांनी अधिकाऱ्यांना दिला.

 

 

Tags: