Belagavi

एमप्लसएमला मराठी भाषकांतून तीव्र विरोध

Share

महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती असादुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम या पक्षाशी हात मिळवणी केल्यावरून मराठी भाषिकातून तीव्र विरोध करण्यात येत आहे.

समितीच्या एमप्लसएम या धोरणाला परखड विरोध करून 43 नंबर वार्डमध्ये समितीच्या प्रवेशाला विरोध केला जात आहे. मनपा निवडणूकमध्ये पहिल्यांदाच एमप्लसएमचे धोरण अवलंबण्यात आल्याने मराठी भाषिकात चर्चेचा विषय ठरला आहे.

सामाजिक माध्यमांवर एमप्लसएम धोरणाबाबत तीव्र आक्षेप घेण्यात येत आहे. मराठी भाषीकातून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच नाही तर हातमिळवणी केलेल्या उमेदवारांना वार्डमध्ये प्रवेश देण्यासही विरोध केला जात आहे. वार्ड नंबर 43 मध्ये याबद्दल मतदारातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला पसंती दिली जात आहे.

 

Tags: