Belagavi

निवडणूक कामात त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घ्या : जिल्हाधिकारी

Share

 बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत कसल्याही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घ्या अशी सूचना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना केली.

बेळगाव मनपा निवडणुकीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मतदान यंत्रांचा वापर, मतदारयाद्यांची पडताळणी आणि मतदान प्रक्रियेबाबत सर्व कर्मचाऱ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोणतीही शंकाकुशंका असेल तर प्रशिक्षणावेळीच त्यांचे निरसन करून घ्यावे. ऐन निवडणुकीत कसलाही गोंधळ माजू देऊ नये. आता अनेक टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे काही शंका असल्यास आताच त्यांचे वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशिक्षकांकडून निरसन करून घ्या अशी सूचना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना केली.

बेळगावातील सेंट पॉंल्स, सेंट जोसेफ आणि सेंट मेरी शाळांमध्ये कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात येत आहे. याठिकाणी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी भेटी देऊन पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Tags: