Raibag

विजेच्या धक्क्याने दोन भावांचा मृत्यू

Share

 विहिरीतील मोटर सुरु करण्यास गेले असता, विजेचा धक्का बसल्याने एकाच कुटुंबातील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायबाग तालुक्यातील निलजी गावात घडली आहे.

होय, राजू बाळाप्पा बडिगेर (वय २५) आणि शंकर रामप्पा बडिगेर (वय २४) अशी या घटनेतील मृत चुलत भावांची नावे आहेत. रविवारी सकाळी शेतीला पाणी सोडण्यास म्हणून ते गेले होते. शेतातील विहिरीतील मोटर सुरु करताना अचानक वीजप्रवाह सुरु झाला आणि त्याचा दोघांनाही तीव्र धक्का बसला. त्यामुळे ते अत्यवस्थ झाले. लोकांनी त्यांना उपचारांसाठी इस्पितळात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्घटनेने बडिगेर कुटुंबावर आभाळ कोसळले. त्यांचा आक्रोश पाहवत नव्हता. कुडची पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेची कुडची पोलीस ठाण्यात नोंदणी करण्यात आली आहे.

 

 

Tags: